Solapur: ट्रक अन् कारचा भीषण अपघात; एक ठार तर दोघे जखमी विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

Solapur: ट्रक अन् कारचा भीषण अपघात; एक ठार तर दोघे जखमी

सोलापूरहून मंगळवेढ्याकडे भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूरहून मंगळवेढ्याकडे भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

ही घटना सोलापूर Solapur मंगळवेढा महामार्गावरील बेगमपूर गावाजवळील स्टेट बँकेसमोर आज घडली आहे. सुनील वाघमारे असे अपघातातील मृताचे नाव आहे. तर गिरीश माने आणि हर्षवर्धन सर्वगोड अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

जखमींवर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून ट्रकने कारगाडीला समोरून जोरदार धडक दिली. यातून हा अपघात घडला आहे. घटनेनंतर ट्रक चालकाने तात्काळ पलायन केले. पुढील कारवाई कामती पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT