SOLAPUR DROUGHT: SAAM TV
महाराष्ट्र

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Solapur Farmers in Distress as Soybean Crop: दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उळे येथे तीन एकर सोयाबीनचे पीक वाळल्याने हवालदिल शेतकऱ्याने पिकावर रोटोवेटर फिरवला.

Omkar Sonawane

दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून जात असून, हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाया जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेले सोयाबीनचे पीक पावसाअभावी पूर्णपणे वाळून गेले आहे. पावसाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी पीक वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाऊस न झाल्याने अखेर उभे पीक करपून गेले. गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस न पडल्याने तालुक्यातील अनेक भागांत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT