Solapur accident Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur Accident : अपघाती निधन झालेल्या वडिलांचा अंत्यविधी उरकला, परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात मुलाचा मृत्यू

Solapur Karmala Accident : बंगळुरू येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत जाताना मुलाच्या वाहनाला १३ मे रोजी करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील वरकुटे इथं पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Prashant Patil

सोलापूर : सोलापूरमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना मुलाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षद झंकर योगी (वय ३५) असं मृत मुलाचं नाव आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बंगळुरू येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत जाताना मुलाच्या वाहनाला १३ मे रोजी करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील वरकुटे इथं पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

रेल्वेतून पडून झाला होता वडिलांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बंगळुरू येथे गेले होते. परत गुजरातकडे जाताना रेल्वेतून पडून झंकार योगी यांचा मृत्यू झाला होता. झंकर योगी यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यविधी उरकून परत गावी गुजरातकडे निघाले होते. मात्र १३ मे रोजी पहाटे कुर्डुवाडीवरून येत असताना वरकुटे गावाजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली. यामध्ये झंकर योगी यांचा मुलगा हर्षद योगी जागीच ठार झाला आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

रस्त्याच्या कडेला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर आनंद पवार, हवालदार आप्पा लोहार, सतीश इंगोले, व रुग्णवाहिका चालक साजिद शेख यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील मयत व जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT