Praniti Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Politics : आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा बांधवांनी पुन्हा अडवलं; एक फोन फिरवताच झाला टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

Praniti Shinde Video : प्रणिती शिंदे यांनी देखील कारमधून बाहेर उतरुन मराठा बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला कुणबी दाखले मिळत नसल्याची तक्रार मराठा बांधवांनी केली.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा बांधवांनी पुन्हा एकदा अडवलं आहे. प्रणिती शिंदे यांना अडवून मराठा बांधवांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाही मराठा बांधवांनी दिल्या.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावच्या मराठा बांधवांना अद्याप कुणबी दाखले न मिळाल्याची तक्रार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. मराठा बांधवांच्या तक्रारीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदेनी थेट प्रांताधिकाऱ्याला फोन लावला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी लोकसभेच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी दौरे करत आहेत. यावेळी प्रणिती शिंदे यांचा ताफा पेनूर गावच्या मराठा बांधवांनी रस्त्यातच अडवला. प्रणिती शिंदे यांनी देखील कारमधून बाहेर उतरुन मराठा बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला कुणबी दाखले मिळत नसल्याची तक्रार मराठा बांधवांनी केली. (Latest Marathi News)

प्रणिती शिंदे यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना फोन लावला. प्रणिती शिंदे यांनी प्रांताधिकाऱ्याशी बोलून मराठा बांधवांना कुणबी दाखले का मिळत नाहीयेत, अशी विचारणा केली. यावेळी दोन दिवसात कुणबी दाखले मिळण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मराठा बांधवांना मिळाले आहे.  

दोन दिवसात कुणबी दाखले न मिळाल्यास वेगळ्या मार्गाने प्रयत्न करण्याचा इशारा देखील शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कुणबी दाखले वाटप करायला स्वतः पेनूर गावात येणार असल्याचं आश्वासन देखील आमदार प्रणिती शिंदे दिलं. यानंतर मराठा बांधवांनी देखील टाळ्या वाजवून प्रणिती शिंदे यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT