Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: "सूडाचे, बदल्याचे अन् बदनामीचे राजकारण.." राऊतांचा मोदी- शहांवर घणाघात; मराठा - ओबीसी वादावर केलं मोठं विधान

Sanjay Raut News: "शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती. बाळासाहेबांचीच राहिलं. इलेक्शन कमिशनला ज्यांची गुलामी करायची आहे त्यांची करावी..." असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

विश्वभूषण लिमये

Solapaur News:

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज सोलापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी- शहांवर सडकून टिका केली. तसेच राष्ट्रवादी अन् शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते कधीही शक्य होणार नाही.. असेही ते म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

2024 साली सोलापूरचं (Solapur) राजकीय चित्र बदलेल असेल. राज्यातलं राजकारण राजकारण राहिले नाही. या राज्याने अनेक प्रमुख नेते पाहिले. पणं इतकं सुडाचं, बदल्याचं आणि बदनामीचं राजकारण या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पाहिले नाही. हे गेल्या १० वर्षात सुरू झालं. असे संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती..

तसेच "मराठा - ओबीसी आरक्षण हे भाजपचेच कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अशा घाणेरड्या राजकारणाची दशकपुर्ती झाली आहे. रावणाची जशी १० तोंडे उडवली गेली. तशी यांचीही उडवली जातील. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती. बाळासाहेबांचीच राहिलं. इलेक्शन कमिशनला ज्यांची गुलामी करायची आहे त्यांची करावी..." असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदी- शहांवर घणाघात..

"भाजप (BJP) ही ढोंगी पार्टी आहे हे सर्वांना माहितीय, ती एक टोळी आहे. अटल बिहारी वाजपयी आणि अडवाणी असताना राजकीय विचारधारा असणारी पार्टी होती ही मोदी - शहा यांची टोळी आहे. जोपर्यंत मोदी - शहा आहेत तोपर्यंत लोकशाहीसाठीचे निर्णय मान्य होणार नाहीत..." असे म्हणत अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT