Solapur Police removing loudspeakers from temples and mosques as per Supreme Court orders. saam tv
महाराष्ट्र

मोठा निर्णय! ऐनदिवाळीत सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले

Solapur Loudspeakers : दिवाळीच्या काळात सोलापूर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या आदेशानंतर मंदिरे, मशिदी, चर्च आणि बुद्ध विहारांमधून २८९ लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आलेत. सोलापुरात पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विश्वभूषण लिमये

  • सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई झाली.

  • मशिदी, मंदिरे, चर्च आणि बौद्ध विहारांचा यात समावेश आहे

ऐनदिवाळीच्या काळात सोलापुरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आली आहेत.आज धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे, यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती.

सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी भोंगे उतरवण्याबाबत निर्णय घेतलाय. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली होती.

सोलापूर शहरात मंदिरे, मशिदी, मदरसा, चर्च, बुद्धविहार अशी ८९३ धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत. त्यापैकी आज २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. यात १९२ मस्जिद आणि दर्गा, ७९ मंदिरे, १० चर्च आणि ८ बौद्ध विहार असे एकूण २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाहेरील तथा वरच्या बाजूला भोंगे लावता येणार नाहीत.

तसेच भोंगे लावण्यासाठी यापुढे परवाना दिला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये भोंग्यांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरूय. भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्यानं सरकारनं अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या आणि जास्त आवाज करणाऱ्या भोंग्यावर सरकारनं जुलै महिन्यात मोठी कारवाई केली होती.

आता सोलापुरात पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकारानंतर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मागील महिन्यात एका पक्षाच्या नेत्यानं भोंग्यांच्याविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंची चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं.

पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या ९९ टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवलेत. मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्येही व्हावी, अशी अपेक्षा आहे. तर ९०० वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील खाली उतरवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT