सोलापूर : जनावरांच्या हाडापासून तेल आणि तूप सदृश्य पदार्थ !  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर : जनावरांच्या हाडापासून तेल आणि तूप सदृश्य पदार्थ !

अवैध कारखान्यावर पोलिसांची धाड...

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जनावरे कत्तल केल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून बनावट तेल आणि वनस्पती तूप सदृश पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी (Solapur Police) कारवाई केली आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावर शिवारात असलेल्या कारखान्यावर धाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हे देखील पहा-

या परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. पोलिसांनी विशेष पथक (Police Squad) पाठवून या ठिकाणी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कत्तलखान्यातील टाकाऊ मांस आणि हाडे मोठमोठ्या कढाईमध्ये शिजवून त्यापासून तेल आणि वनस्पती तूप सदृश्य पदार्थ निर्मिती सुरू असल्याचं निष्पन्न झालं.

या ठिकाणाहून पोलिसांनी दोन कामगारांना ताब्यात घेतलेलं आहे. प्राथमिक तपासामध्ये कारखान्यासाठी वापरली जाणारी वीज देखील चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी देखील या कारखाना चालकांनी घेतलेली नाही. अतिशय घाणीत तयार केला जाणारा पदार्थाची विक्री नेमकी कुठे केली जात होती हा मात्र मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मातोश्रीवर बैठकीला 4 खासदार गैरहजर; कारण काय? संजय राऊत स्पष्टच बोलले, ठाकरे गटात घडामोडींना वेग

Prajakta Mali Old Photos: प्राजक्ता माळी १३ वर्षांपूर्वी कशी दिसायची? पाहा अभिनेत्रीचे क्यूट जुने फोटो

Early Cancer Signs in Legs: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात 5 मोठी लक्षणं

Maharashtra News Live Update: लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी

Assembly Elections: पाच राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाजणार विधानसभा निवडणुकांचं बिगुल; काय आहे सरकार आणि आयोगाचा प्लॅन?

SCROLL FOR NEXT