Solapur Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Solapur Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने द्राक्षबाग भुईसपाट; तोडणीवर आलेल्या द्राक्षांचे नुकसान

Solapur News : राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. याचा फटका शेतातील पिकांना बसला आहे. सोमवारी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना बसला असून तोडणीवर आलेल्या द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रामुख्याने द्राक्ष बागांचे यात अधिक नुकसान झाले आहे. याशिवाय शेतातील रब्बी पिकांना देखील याचा फटका बसला आहे. यात वैराग आणि परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. 

बार्शी, वैराग परिसरात अवकाळी पाऊस 

बार्शी तालुक्यातील माळेगाव शिवारात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच वैराग परिसरातील मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत. परिपक्व झालेल्या द्राक्ष काही दिवसांनी तोडणीवर होत्या. यातच अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

नुकसान भरपाईची मागणी 

सुभाष घोडके या शेतकऱ्याची १ हेक्टर द्राक्षबाग आडवी झाली आहे. त्यामुळे साधारण १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या पिकाला पोटच्या मुलाप्रमाने वाढवलं, ते पिक मातीमोल झाल्यामुळे शेतकरीराजा रडकुंडीला आला आहे. दरम्यान द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याने या नुकसानाची पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT