Solapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime News: आधी बायकोची हत्या, मग स्वतः उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक घटना

Solapur News Today: सोलापुरातील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News Today: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील मंद्रूप येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून हत्या केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. लाडलेसब हुसेनी नदाफ( वय वर्षे 65) असे असे पत्नीची हत्या करणार्‍या पतीचे नांव असून नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे मृत पत्नीचे नांव आहे. (Solapur Crime News)

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे,ग्रेड पीएसआय शहाजी कांबळे,माजिद शेख,शाहनूर फकीर,सागर चव्हाण कृष्णा पवार संजय कांबळे अविनाश पाटील आदींनी घटनास्थळी हजर होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दरम्यान, लाडलेसाब याने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.मंद्रूप पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्वतःच्याच अत्याचाराचा रचला बनाव, विद्यार्थिनीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले; बीडमधील धक्कादायक प्रकार

चौफेर टीकेनंतर डाव फिरवला; काँग्रेस-भाजप आघाडीची नोंदणी रद्द, मालेगावात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरणी मोठी अपडेट

Tuesday Horoscope : आनंदाला सीमा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार घडणार

Gulgule Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट गुळगुळे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT