Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्यनारायण महापूजा करत ठिय्या; पाणी प्रश्‍नासाठी शिवसेना आक्रमक

महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्यनारायण महापूजा करत ठिय्या; पाणी प्रश्‍नासाठी शिवसेना आक्रमक

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरवासीयांच्या पाण्यासाठी आक्रमक होत (Shiv Sena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारात पायऱ्यांवर सत्‍यनारायण महापूजा घालत ठिय्या आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

सोलापूर (Solapur) शहरवासीयांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. स्मार्ट सिटीच्‍या यादीत सोलापूर शहराचा सहभाग असताना देखील शहर वासियांना चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या प्रश्‍नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्‍याचे पहावयास मिळाले.

तर प्रशासनाचे घालणार श्राद्ध

सत्‍यनारायण महापुजेनंतर सुरळीत पाणी पुरवठा होईल; असा आशावाद व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पालिकेच्या पायऱ्यांवर सत्यनारायण महापूजा घालण्यात आली. या सत्यनारायण महापूजेनंतर देखील प्रशासनाला सद्बुद्धी येऊन पाणीपुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास प्रशासनाचे श्राद्ध घालण्यात येईल; असा इशारा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पायलटकडून क्रू-मेंबर तरुणीवर बलात्कार, फाईव्ह स्टार हॉटेलच्या खोलीत खेचत नेलं अन्...

Hill Stations For Couples : भारतातील या ५ हिल स्टेशनवर कप्लसने एकदा तरी गेलेचं पाहिजे

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २२ जण जखमी

Maharashtra Winter Tourism: हिवाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ८ ठिकाणे करा एक्सप्लोर, हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत हरवून जाल

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ९ तरुणांची एकाचवेळी सैन्य दलात निवड; गावकऱ्यांनी केला जल्लोष

SCROLL FOR NEXT