Solapur Karmala Shivsena Saam TV
महाराष्ट्र

Shivsena Political Crisis : करमाळ्यात शिवसेनेला मोठा धक्का; शहर प्रमुखासह 20 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

युवासेनेच्या तालुका प्रमुखासह शहर प्रमुखांनी राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

भारत नागणे

Solapur Shivsena News : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. आता ही गळती थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही युवा सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. युवासेनेच्या तालुका प्रमुखासह शहर प्रमुखांनी राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. (Karmala Yuvasena Latest News)

युवा सेनेचे करमाळा तालुका प्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्यासह 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या तडजोडीच्या राजकारणाला कंटाळून आपण युवा सेनेच्या पदाचे राजीनामे देत असल्याचे युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगितले. (Karmala Todays News)

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कडवट शिवसैनिक आहोत. यापुढे ही यांचे विचार घेवून काम सुरू ठेवणार असल्याचंही विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT