Sharad Koli News Saamtv
महाराष्ट्र

Sharad Koli News: मुंब्र्यातील राड्याची धग सोलापुरात.. शरद कोळींचा शिंदे गटाला थेट इशारा, म्हणाले; तुम्हाला दिवसा...

Maharashtra Political News: मुंब्र्यातील शाखेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील सुरु असलेल्या हायहोल्टेज राड्याची धग सोलापुरपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Political News:

मुंब्रामधील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. या शाखेची पाहणी करता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाण्यात येत आहेत. त्याआधीच त्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले आहेत. मुंब्र्यामधील या हायहोल्टेज राड्याची धग सोलापुरपर्यंत पोहोचली असून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या स्वागतासाठी ठाणे ते मुंब्रा या दरम्यान पोस्टर लावण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच यामधील जवळपास 90 टक्के पोस्टर फाडण्यात आले आहेत. पोस्टर फाडल्यामुळे आता ठाण्यात उद्धव गट आणि शिंदे गटात वातावरण चांगलेच तापलं आहे.

ठाण्यातील या राड्यानंतर सोलापुरातील (Solapur) उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्र उपनेते शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. "तुम्ही रात्रीचे पोस्टर फाडता तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडू.." असे शरद कोळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच पुढे बोलताना "ज्या मुख्यमंत्र्यांच्या जीवावर हे सर्व काही केले आहे, त्यांची सत्ता आज नाही तर उद्या जाणार आहे." असा घणाघातही शरद कोळी (Sharad Koli) यांनी केला आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या विरोधानंतरही शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT