Solapur Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

Solapur Sugar Factory : सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना गाळप; ४ साखर कारखान्यांना दंडाची नोटीस

Solapur news : राज्यात सोलापूर जिल्ह्यातच सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक असताना एफआरपी थकविणे आणि साखर कारखाना विक्री करण्याला प्राधान्य दिले जात आहे

विश्वभुषण लिमये

सोलापूर : शेतकऱ्यांना उसाच्या पैशासाठी वेठीला धरणाऱ्या साखर कारखान्यांनी दुसरीकडे शासकीय देणीही दिली नाही. त्यामुळे साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहार. यामुळे जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. 

राज्यात सोलापूर जिल्ह्यातच सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक असताना एफआरपी थकविणे आणि साखर कारखाना विक्री करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे ऊस घालून पैसे न मिळालेले शेतकरी, तोडणी वाहतूक केलेले मजूर आणि वाहन धारक आर्थिक अडचणीत येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३२ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला आहे.

गाळप परवाना नाकारला होता 

मागील वर्षातील ऊस उत्पादकांचे तोडणी आणि वाहतुकीचे तसेच शासकीय देणे थकविणाऱ्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना नाकारला. देणी द्या मगच गाळप परवाना देण्यात येईल; असे बजाविण्यात आले होते. असे असताना देखील परवान्याशिवाय सोलापूर जिल्ह्यात चार कारखान्यांनी गाळप सुरू केले. यामुळे प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

चार साखर कारखान्यांना दंड 

साखर आयुक्तांनी दंड आकारलेल्या साखर कारखान्यांमध्ये मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी साखर कारखान्याला १० कोटी २२ लाख ५० हजार रुपये, धोत्री येथील गोकुळ शुगरला ५ कोटी ७० लाख ९७ हजार ५०० रुपये, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारीला तीन कोटी १३ लाख ९७ हजार ५०० रुपये व मातोश्री लक्ष्मी शुगरला एक कोटी २४ लाख ८० हजार रुपये दंड आकारला आहे. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

SCROLL FOR NEXT