solapur news Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu patil : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Shahaji Bapu patil Latest News : सांगोल्यातील शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती आलेली नाही.

भारत नागणे

सोलापूर : सोलापुरातून मोठी राजकीय वृत्त समोर आलं आहे. सोलापुरात युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुखांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. संपर्क प्रमुख हे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत. या घटनेने सोलापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांच्या ऑफीससमोर उभ्या केलेल्या कारवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत. अज्ञात व्यक्तीने कारवर हल्ला केला, त्यावेळी कारमध्ये कोणी नव्हतं. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सागर पाटील यांच्या कारवर अज्ञाताने हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सागर यांच्या कारवर नेमका कोणी हल्ला केला, याची माहिती समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती हाती आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेली कार अज्ञातांनी फोडली. अज्ञातांनी कारच्या मागील बाजूची काच दगडाने फोडली. ही कार शहाजी बापू पाटील यांच्या पुतण्याची होती. सागर पाटील यांची कार फोडल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सागर पाटील यांची कार कोणी कशामुळे फोडली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञात व्यक्तीने दगड मारून घटनास्थळावरून पळ काढलाय. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केला. शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. सांगोल्यात परभव झाल्याने शहाजीबापू पाटील यांना घरी बसावं लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT