Ajinkya Jayawant Raut News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरात प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

Ajinkya Jayawant Raut News: सोलापुरात प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

Solapur News: सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय. अजिंक्य जयवंत राऊत असे त्यांचे नाव आहे.

लेडी डफरीन चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकादरम्यान असलेल्या प्रसिद्ध हॉटेल ध्रुवचे अजिंक्य राऊत हे मालक होते. त्यांचे वडील दिवंगत डॉ. जयवंत राऊत हे निष्णात शल्यविशारद होते.

प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातील अजिंक्य राऊत यांचाही मोठा मित्र परिवार होता. यात अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सिनेनाट्य कलावंत, उद्योजकांचा समावेश होता. मात्र अलिकडे राऊत हे आजारी होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. (Latest Marathi News)

विजापूर रस्त्यावरील इंदिरा नगरमध्ये स्वतःच्या निवासस्थानी राऊत यांनी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. त्यावेळी घरात दुसऱ्या खोलीत असलेल्या त्यांच्या पत्नी धावून आल्या.

त्यांनी शेजारांच्या मदतीने रूग्णवाहिका मागवून पती अजिंक्य यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT