Solapur News Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाज आक्रमक! विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा; नेमकं काय घडलं?

RadhaKrishna Vikhe Patil News: धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे

Gangappa Pujari

Solapur News: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून राज्यभरात आंदोलने, आणि उपोषणे होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे. याच मागणीवरुन धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गाजत असताना धनगर समाजही आक्रमक झाला आहे. सोलापूरमधील (Solapur) शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

पालकमंत्री विखे पाटील (Rashakrishna Vikhe Patil) सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान धनगर समाजातील आंदोलकांनी त्यांची घेतली. या भेटीवेळीच शेखर बंगाळे या आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकला. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा अद्याप मिटलेला नसून लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT