Solapur News Congress NCP Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: काँग्रेस- राष्ट्रवादीचा पुन्हा हातात हात; सोलापुरातील वादावर पडदा टाकत कार्यकर्ते एकत्र

काँग्रेस- राष्ट्रवादीचा पुन्हा हातात हात; सोलापुरातील वादावर पडदा टाकत कार्यकर्ते एकत्र

विश्वभूषण लिमये

सोलापुर : सोलापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला. त्यानंतर (Congress) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांचे वाद मिटवल्याचे देखील सांगितले. (Maharashtra News)

मागील काही दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदार संघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु होते. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालसमोर निदर्शने केली होती. तसेच प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीच्या कार्याल्यासमोर आंदोलन केले होते.

कॉंग्रेस– राष्‍ट्रवादीची झाली बैठक

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वातावरण तापलेलेले असताना आज या वादावार पडदा टाकण्यात आला. शहरातल्या (Solapur) एका हॉटेलमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सुरु असलेले वाद हे निरर्थक आहेत आपला खरा शत्रू हा भाजप असून त्याविरोधात लढूयात अशी चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घेऊन घोषणाबाजी केली. झालेल्या वादावार पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची देखील भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT