Solapur News Saam tv
महाराष्ट्र

शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन

शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महावितरणकडे राज्यातील लोकप्रतिनिधींची वीजबिल थकीत आहेत. हे वीजबिल भरून लोकप्रतिनिधींना चिंतामुक्त करण्यासाठी सोलापुरातील एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने (farmer) राज्यातील लोकप्रतिनिधींचे वीजबिल भरण्यासाठी आजपासून भिकमागो आंदोलनाला सुरुवात केली आहे. (solapur news Begging movement of farmers people representatives for electricity bill)

सोलापुरातील (Solapur) रुपाभवानी मातेच दर्शन घेऊन अनिल पाटील या शेतकऱ्याने भीक मागायला सुरुवात केली आहे. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस ते भीक मागणार असून मिळालेली रक्कम संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे ते जमा करणार आहेत. फोन पे आणि गुगल पेच्या माध्यमातून ते बिलासाठी भीक स्वीकारणार आहेत. गळ्यामध्ये एक खपाटाचा डब्बा अडकवून ते भीक मागात आहेत. त्यामुळे अनिल पाटील या शेतकऱ्याने सुरु केलेल्या या अतरंगी आंदोलनाची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना मोठा फटका, आता किती रुपयांनी दूध महागणार?

Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

Air Taxi: भारतात येणार हवेत उडणारी टॅक्सी, ८ मिनिटांत पार करणार ३६ किमी अंतर; प्रवासी भाडे किती?

Maharashtra Live News Update: राहूल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात हजर रहाणार

SCROLL FOR NEXT