Anganwadi worker dies of heart attack Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : हृदयविकाराचा झटका आल्याने २४ वर्षीय अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, शाळेतच घेतला शेवटचा श्वास

Solapur News : शाळेत काम करताना अंगणवाडी सेविकेला चक्कर आली. तिला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Yash Shirke

Solapur News : सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळमधील एका शाळेतील अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना औंढी ताल, मोहोळ येथे घडली आहे.

मृत अंगणवाडी सेविकेचे नाव अंजली सागर घोडके (वयवर्ष २४) आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ती औंढी परिसरातील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. आज (२३ जानेवारी) तिला दुपारी एकच्या सुमारास चक्कर आली. त्याच अवस्थेत तिला मोहोळ येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. दरम्यान उपचार सुरु करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे औंढी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत. चौवीसाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटनेने तेथील लोकांनी धसका घेतला आहे. या घटनेमुळे दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. काही दिवसांपूर्वी ८ वर्षीय मुलीचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT