Solapur News Saam Digital
महाराष्ट्र

Solapur News : दक्षिण सोलापुरात अंगावर वीज पडून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नातेवाईकांचा सरकारी रुग्णालयात एकच आक्रोश

Solapur Heavy Rain : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.

Sandeep Gawade

विश्वभूषण लिमये

राज्यभर आज अवकाळी पावसाचं तांडव पहायला मिळालं. गारपीट वादळी वाऱ्यानं पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळपासून कडक उन असताना अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी लावण्याच्या अंगावर वीज पडली. तीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांचा सरकारी रुग्णालयात एकच आक्रोश केला. अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामधून हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पाणी आली आहे. नाल्याला अचानक पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव -गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

यवतमाळमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर

यंदाच्या उन्हाळ्यातील उन्हाच्या पाराने गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च उच्चांक गाठला असून यवतमाळ जिल्ह्याचा पारा 42 सेल्सियस अंशावर पोचला आहेत. वणी आणि घाटंजी तालुक्यात उन्हामुळे भोवळ येऊन पडल्याच्या घटना घडल्या.अशात लग्न सराई सुरू आहे. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहेत. दाहतकेपासून बचाव करण्यासाठी कुलर,एसीसारख्या इलेक्ट्रिक वस्तूचा वापर केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल

Tea Addiction : चहा प्यायल्याने भूक मरते का? नेमकं सत्य काय? रिसर्चमधून महत्वाची माहिती समोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये संकेत पाठकची 'किंग-स्टाइल' एन्ट्री, काय असणार गेम प्लान?

Amla Juice For Long Hair: लांब आणि काळेभोर केसांसाठी प्या आवळ्याचा ज्यूस, सोपी आहे रेसिपी

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी केसांना लावा 'हा' पदार्थ, नाहीतर केस होतील खराब अन् चमक होईल गायब

SCROLL FOR NEXT