Dr Shirish Valsangkar  Saam tv
महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : न्यूरोसर्जन वळसंगकरांची सुसाईड नोट समोर, आयुष्य संपवण्याआधी काय लिहिलं, ती महिला कोण? | VIDEO

Dr. Shirish Valsangkar solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येआधी लिहिलेल्या नोटमध्ये मनीषा मुसळे यांचा उल्लेख. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केली अटक.

Namdeo Kumbhar

Dr. Shirish Valsangkar Death Case Update : सोलापुरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वळसंगकारांनी आयुष्य संपवण्याआधी एक लिहिलेली नोट पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. वळसंगकरांनी त्या नोटमध्ये महिलेचा उल्लेख केला होता. पोलिसांनी रूग्णालयातील महिलेला अटक केली असून तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.त्यानंतर रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक केली आहे.

न्यूरोसर्जन वळसंगकरांनी सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे माने या महिलेच्या नावाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी मनीषा मुसळे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. मनीषा मुसळे माने हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेला सोलापूर पोलिसांनी रूग्णालयातून अटक केली आहे. मनीषा हिच्यावर वळसंकर यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले होते. मनीषा मुसळे-माने या वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहात होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT