Solapur Mahapalika : सोलापूर महापालिका  SaamTvNews
महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; अनेक वॉर्ड जैसे थे राहिल्याने इच्छुकांमध्ये आनंद

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी जाहीर केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरची (Solapur) प्रभाग रचना कशी असेल याबाबत उत्सुकता होती. आज प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पालिकेत (Solapur Mahapalika) पाहायला मिळाली. अनेक प्रभाग जैसे थे राहिल्याने इच्छुक उमेदवारांनी आनंद व्यक केला.

हे देखील पहा :

तर, काही प्रभाग (Ward) फुटल्याने काही जण नाराज असल्याचं ही पाहायला मिळालं. नव्या रचनेनुसार तीन सदस्य पद्धतीने होणाऱ्या सोलापूर (Solapur) महानगर पालिकेच्या निवडणुकीतून (Election) 38 प्रभागातून 113 नगरसेवक (Corporator) निवडण्यात येणार आहेत. यातील 37 प्रभाग तीन नगरसेवकांचे तर 38 वा प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल.

साधारणपणे 22 हजार 700 ते 27 हजार 600 लोकसंख्येचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. आज झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारी पर्यंत सूचना हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT