Solapur Karmala Wife Murder Husband Suicide Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur Crime : त्रास असह्य झाला, बापाने पोटच्या लेकीसमोर आईला संपवलं, अन् स्वत:चा जीव घेतला; आजोबांनी दरवाजा तोडला तर...

Solapur Crime News : युवराज शेरे हा पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरेवस्ती येथे राहत होता. युवराज शेरे आणि त्याची पत्नी रूपाली दोघेच घरी होते.

Prashant Patil

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा गळा दाबून हत्या करून पतीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१) आणि रूपाली युवराज शेरे (वय २५) असं मृत पती-पत्नीचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीवर चिडचिड करत होता, कुटुंबियांशी देखील तो मागील दोन महिन्यापासून व्यवस्थित बोलत नव्हता. त्याला कोणता तरी त्रास होता, ज्याच्यातून टोकाचं पाऊल उचलत त्याने आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

युवराज शेरे हा पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरेवस्ती येथे राहत होता. युवराज शेरे आणि त्याची पत्नी रूपाली दोघेच घरी होते. घरात कोणीही नसल्याने युवराजने पत्नी रूपालीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आपल्या हातून होत्याचं नव्हतं झाल्याच्या पश्चातापातून युवराजने देखील स्वतः घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेलेले कुटुंबातील इतर लोक घरी आले. त्यावेळी चिमुकली बंद घरात रडत होती. त्यावेळी युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला. तेव्हा सून रूपाली निपचित पडली होती आणि युवराज लोखंडी अँगलला लटकत असल्याचं दिसले. त्यांनी युवराजला खाली उतरवलं आणि पोलिसांना कळविलं. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले आहेत. पोलीस निरीक्षक विनोद घुगे याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

युवराज शेरे हा काही दिवसांपासून तणावाखाली होता. त्यातूनच युवराज याने पत्नी रूपालीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर युवराज यानेही आत्महत्या केली आहे. या घटनेनं करमाळा हादरून गेलं आहे. पती-पत्नीच्या मृत्यूनंतर साडेचार वर्षांची चिमकुली मात्र पोरकी झाली आहे. या घटनेची करमाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT