Gram Panchayat Elections Results 2022 News Update Eknath Shinde News SAAM TV
महाराष्ट्र

Pandharpur Grampanchayat Results | पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर CM एकनाथ शिंदे गटाची सत्ता

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता ग्रामीण भागातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

भारत नागणे

Pandharpur Takli Grampanchayat Elections Result: पंढरपूर: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची सत्ता जाताच, राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

सत्तांतरानंतर ग्रामीण भागातही परिवर्तन बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला पंढरपुरात विजय मिळाला आहे. शिंदेंचे समर्थक असलेल्या महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात विविध ठिकाणी दौरे केले. राज्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे सध्या तरी चित्र आहे. ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेकडून (Shivsena) आदित्य ठाकरे हे देखील राज्यभर दौरे करत असून, त्यांच्या सभांना गर्दी होत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरूच आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामीण भागातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. सत्तांतरानंतर राज्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) झाली. त्याचे निकाल आज जाहीर झाले असून, काही भागांत उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटानंही बाजी मारली आहे.

एकनाथ शिंदे गटाला पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील टाकळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळाली आहे. शिंदे गटाला सत्ता मिळालेली सोलापूर जिल्ह्यातील टाकळी ग्रामपंचायत पहिली ठरली आहे.

निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक व शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख महेश साठे यांनी राष्ट्रवादीच्या समर्थकांच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत काबिज केली आहे.

निवडणुकीत शिंदे समर्थक संजय देविदास साठे, रेश्मा संजय साठे, रोहिणी महेश साठे यांच्यासह १४ जागांवर विजय मिळवला आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळीत राज्यातील पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.

माढ्याच्या पडसाळी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

दुसरीकडे, माढ्यातील पडसाळी ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. ९ पैकी ५ जागांवर भाजपप्रणित लोकनेते दत्तानाना फरड ग्रामविकास आघाडीने यश मिळवले आहे. तर उर्वरित ४ जागांवर विठ्ठल ग्रामविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्याने चुरस वाढली आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT