solapur shrikant deshmukh saam tv
महाराष्ट्र

सोलापूरच्या श्रीकांत देशमुखांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.

भारत नागणे

सोलापूर : भाजपचे (BJP) सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सदर व्हिडीओतील महिलेने देशमूख यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपची वरिष्ठ नेते खडबडून जागे झाले. त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. (Solapur Shrikant Deshmukh News In Marathi )

सदर व्हिडीओत महिलेने श्रीकांत देशमुख फसवणुकीचे गंभीर आरोप केले. सदर व्हिडीओत महिला आरोप करताना म्हणते, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा'. असे आरोप महिलेने देशमुख यांच्यावर केले. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडीओनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे सोलापूर (Solapur) जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूरच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार हा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविला आहे. तसेच व्हायरल व्हिडीओमधील महिलेने श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. सदर व्हिडीओ सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: दुपारी 3 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान

MCA awards ceremony: MCA अवॉर्ड्समध्ये शार्दुल-सिद्धेशचा दबदबा, आयुष म्हात्रेसह वर्ल्ड कप स्टार्सचा सन्मान

Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

Marathi compulsory: मराठी शिकायचीच नसेल तर निघा; मराठमोळ्या गायकाचा परप्रांतियांना स्पष्ट शब्दात सल्ला

Young Age Heart Attack Reason: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू, कमी वयात हार्ट अटॅक येण्याची नेमकी कारणे काय?

SCROLL FOR NEXT