Ranjitsinh Disale Saam Tv
महाराष्ट्र

"ग्लोबल टीचर" वर होणार शिस्तभंगाची कारवाई? शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला CEO कडे अहवाल

तत्पूर्वी चौकशी समितीच्या अहवालाची होणार पडताळणी

विश्वभुषण लिमये

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करत असताना कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) नियुक्‍ती (Appointment) असतानाही तेथे गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरवातीला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. त्यानंतर गैरहजर काळातील जवळपास ३४ महिन्यांचे वेतन वसूल केले जाणार आहे. पण, तत्पूर्वी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्‍त केलेल्या चौकशी समितीच्या अहवाल बाबींची पडताळणी होणार आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) , राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी डिसले गुरुजींचा सन्मान केला. पण, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी केलेल्या रजेच्या अर्जानंतर ग्लोबल टीचर ग्राउंडवर आले. त्यानंतर डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कारासाठी नेमक्‍या कोणत्या बाबींची माहिती संबंधित संस्थेला दिली होती, त्याची पडताळणी झाली. त्या वेळी त्यांनी आपली शाळा (School) आदिवासी भागात असून ती शाळा जनावरांच्या गोठ्यात भरते. विविध भाषेतील विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असून त्यांच्यासाठी मी कन्नड भाषा शिकलो, त्या परिसरात बालविवाहाचे प्रमाण अधिक होते, पण माझ्या प्रयत्नातून शाळेतील मुलींची संख्या वाढली आणि बालविवाह थांबले, अशा बाबी पुरस्काराच्या अर्जात नमूद केल्याची बाब समोर आली.

त्यानंतर त्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी ग्लोबल टीचरवर कारवाईची मागणी झेडपीच्या सभागृहात केली. त्याअनुषंगाने प्रशासनाने आता कारवाईची फाईल हातात घेतली असून आता डिसले गुरुजींवर कारवाई अटळ मानली जात आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. डिसले गुरुजी म्हणतात, मी 'डायट'वर काम केले आहे तर 'डायट'कडे ते फिरकलेच नाहीत, असे तेथील प्राचार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालातील प्रत्येक बाबीची पडताळणी करूनच पुढील कारवाई केली जाईल.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT