Crime News saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime News : जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

अक्कलकोट तालुक्यातील जकापूर येथील धक्कादायक घटना

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News In Marathi : सोलापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील जकापूर येथे लग्नास आड येणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. बाळू माळू असे आरोपीचे नाव आहे.

मृत तरुणीसोबत आणि आरोपी बाळू माळू याचे होते प्रेमसंबंध. तरुणी बाळूच्या होणाऱ्या लग्नास विरोध करत असल्याने त्याने जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं. २९ जानेवारी रोजी सकाळी ०६:०० वा चे पुर्वी जकापूर येथील कल्याणी आळगी यांचे शेतातील लिंबाचे झाडाचे फांदीस कोणत्यातरी अज्ञात कारणाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

परंतु सदर मयताचे गळ्यावरील व्रण, व घटनास्थळावरील सुक्ष्म निरीक्षण केले असता संशयास्पद आढळून आले. शवविच्छेद अहवालानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे अक्कलकोट दक्षिण पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT