सुप्रीम मस्कर, साम टिव्ही
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. राज्यात ७ रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. तर ६८१ रुग्णांची नोंद झालीय. त्यात कोरोनाचे ४६७ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, सोलापुरातील माळशिरस तालुक्यात कोविडचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्यातील ९ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झालीय. त्यात सोलापुर जिल्ह्यात रुग्ण सापडल्यानं पुन्हा एकदा आषाढी वारीवर कोरोनाचं सावट पसरलंय. हजारो किलोमीटर पायी चालत वारीकरी आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुर गाठतात. या वारीत महाराष्ट्रातसह कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक राज्यातून भाविक सोलापुरात येत असतात. अशात पुन्हा कोरोनाचं सावट वारकऱ्यांची आणि प्रशासनाचीही चिंता वाढवणारं आहे. देशात आतापर्यंत १ हजार ८२८ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. राज्यानुसार कोरोनाचा हा वाढता आकडा चिंतेत भर घालणारा आहे.
महाराष्ट्र- ६८१
केरळ - ७२७
दिल्ली - १०४
गुजरात- १८३
कर्नाटक- १४८
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सरकारने सर्व्हेक्षण सुरु केलंय. मात्र नागरिकांनीही सतर्क राहायला हवे. सहव्याधीग्रस्त रुग्णांनी मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनाला न घाबरता, आवश्यक ती खबरदारी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.