Solapur Congress Leader Joins Shinde Shivsena Group Saam Tv
महाराष्ट्र

Solapur : काँग्रेसला राज्यात आणखी एक मोठा झटका, माजी मंत्र्यानं साथ सोडली

Solapur Congress : सोलापूरामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सिद्धराम म्हेत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी म्हेत्रे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सिद्धराम म्हेत्रे आणि म्हेत्रे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. पण त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत म्हेत्रे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये बैठक घेत सिद्धराम म्हेत्रे यांनी शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सिद्धराम म्हेत्रे हे सोलापूरमधील काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

रविंद्र धंगेकर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसची साथ सोडली. काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सिद्धराम म्हेत्रे यांच्यासारख्या बड्या नेत्यानेही काँग्रेसचा हात सोडला आहे. यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसची ताकद कमीकमी होत असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे हत्येचा कट रचनाऱ्यांच्या निषेधार्थ उद्या आंबेजोगाईमध्ये मोर्चा

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट; अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट, पोलिसांचा युटर्न

Vande Bharat Express: भंगारातून सरकारच्या तिजोरीत ८०० कोटींची भर, ७ वंदे भारत ट्रेन खरेदी करता येईल इतका पैसा कमावला

SCROLL FOR NEXT