Barshi Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Barshi Vidhan Sabha : बार्शीचे अपक्ष आमदार भाजपच्या तिकिटावर उतरणार मैदानात; महायुतीच्या जागा वाटपपूर्वीच ठोकला दावा

Solapur News : यंदा महायुतीचे जागावाटप होण्या अगोदरच राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेवर दावा केला आहे.

Rajesh Sonwane

बार्शी (सोलापूर) : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी यंदाची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढणार असल्याची घोषणा केली आहे. राजेंद्र राऊत हे बार्शीचे अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून निवडणुकीसाठी जागा वाटप होण्यापूर्वीच राजेंद्र राऊत यांनी जागेवर दावा ठोकला आहे. 

गेल्या पंच वार्षिक विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) बार्शीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. यामुळे राजेंद्र राऊत यांनी बंड पुकारला होता. यात त्यांनी विजय मिळवत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र यंदा महायुतीचे जागावाटप होण्या अगोदरच राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेवर दावा केला आहे. राजेंद्र राऊत यांचा शिवसेना, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप (BJP) असा राजकीय प्रवास राहिला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं; या मागणीसाठी राजेंद्र राऊत यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केल होतं.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांची ओळख आहे. भाजप आणि महायुती सरकारकडून बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण राजेंद्र राऊत यांनी दिलं आहे. मात्र, महायुती अगोदरच भाजपकडून या मतदारसंघावार दावा केल्याने याचे परिणाम काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Saree Blouse Designs : मकर संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा 'हे' फॅशनेबल ब्लाउज, सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

Aagri-Koli Style Mangalsutra Designs: आगरी-कोळी मंगळसूत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, लग्नात मिरवण्यासाठी नक्की ट्राय करा

Raigad Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला ताम्हिणी घाटात अपघात, ५ ते ६ जण गंभीर जखमी

Lipstick for Skin Tone: तुमच्या स्कीन टोननुसार कशी लिपस्टिक निवडाल?

SCROLL FOR NEXT