Solapur Sucide News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : "मी तुझ्या लायकीचा नाही..." रेल्वेपुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Solapur Sucide News : सोलापुरात ४७ वर्षीय व्यक्तीने कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुलाला भावनिक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • सोलापुरात ४७ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

  • कर्जबाजारीपणा आणि व्यसनाधीनता हे प्रमुख कारण

  • आत्महत्येपूर्वी मुलाला भावनिक मेसेज

  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर, परिसरात हळहळ

विश्ववभूषण लिमये, सोलापूर

Solapur Sucide News सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ४७ वर्षीय अनिल मारुती नरवडे यांनी रेल्वे पुलावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी नरवडे यांनी आपल्या मुलाला भावनिक शब्दात व्हाट्सअपवर मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये त्यांनी "मी तुझ्या लायकीचा वडील नाही" असे म्हटले आहे. या घटनेने नरवडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल नरवडे यांनी कर्ज घेतलं होत. हे कर्ज फेडण्यासाठी स्वतःची तीस हजार रुपयांची दुचाकी गहाण ठेवावी लागली होती. तसेच अनिल हे दारू, जुगार याच्या आहारी गेले होते. वाढता कर्जाचा बोजा आणि सततच्या टेन्शनने नरवडे यांनी सोलापुरातील संभाजी महाराज तलाव परिसरातील रेल्वे पुलावरून उडी घेत आत्महत्या केली.

आत्महत्या पूर्वी नरवडे यांनी त्यांच्या मुलाला व्हाट्सअँपवर मेसेज करून 'मी तुझ्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ कर. वाईट मार्गाला लागल्यामुळे मी कधी सुधारलो नसतो. कृष्णा, मी माझे सर्व ओझे तुझ्यावर सोडून जात आहे. तू आई आणि भावाचा सांभाळ कर. मी धरलेला मार्ग कधीच धरू नकोस. कारण तो कधीच चांगला ठरला नाही' असा मेसेज करत नरवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच दारू, जुगार याच्या आहारी गेलेल्या बापाने जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT