गणपती सोबत एक रोपटे अन् कुंडी भेट! अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश अरुण जोशी
महाराष्ट्र

गणपती सोबत एक रोपटे अन् कुंडी भेट! अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश

अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश

अरुण जोशी

अमरावती : गणपती बाप्पा काही दिवसातच विराजमान होणार आहे. राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणपती उत्सव साजरा केला जातो. मात्र, हा उत्सव साजरा करत असतांना जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी निसर्गावर मोठा परिणाम होता. यामुळे निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता अमरावती येथील नीलेश कंचनपुरे या गणपती विक्रेत्याने गणपती उत्सवात चांगला संदेश दिला आहे.

हे देखील पहा-

त्यांच्याकडे पूर्णपणे मातीच्या गणपती मूर्ती असून यामध्ये तो गणपती सोबत ग्राहकांना एक झाड सुद्धा आणि कुंडी भेट देत आहेत. यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करा असा संदेश तो देत आहे. हल्ली प्लास्टर ऑफ प्यारीसचा वापर होवू लागला आहे. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत तर नाहीतच पण त्यांचे विघटन देखील लवकर होत नाही. यामुळे अशा मूर्तींचे खंडित भाग विसर्जनानंतर उघड्यावर येतात.

हे प्लास्टर ऑफ प्यारीस पुनर्वापरास देखील उपयोगी नसते. गणेशमूर्ती सजावटीसाठी जे मखर वापरले जाते. त्यामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात आढळतो. हे घटक विघटनशील नसल्याने, पर्यावरणास हानिकारक ठरतात. आणखी महत्वाचा मुद्दा येतो, तो निर्माल्य विसर्जनाचा. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून हे निर्माल्य नदी, तलावात विसर्जित केले जाते.

अशा पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतांना हानी पोहोचते. सृष्टीचे जीवनचक्र बिघडते, म्हणून नीलेश सामाजिक संदेश देत मातीच्या मूर्ती सोबत एक रोपटे आणि किडी मोफत देत आहे, जेणेकरून ही मूर्ती याच कुंडीत विराजित करून त्यात हे रोपटे लावावे असा संदेश निलेशनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT