Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News: ....तर आम्ही भाजपसोबतही बसू; प्रकाश आंबेडकरांचं राऊतांना स्पष्ट प्रत्युत्तर

अशात आता प्रकाश आंबेडकरांनी थेट भाजपबरोबर जाण्याचा इशारा दिला आहे.

Ruchika Jadhav

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने सातत्याने त्यांच्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते टीका करत आहेत. यावर संजय राऊत यांनी देखील त्यांची आणि पक्षाची भूमिका मांडली होती. अशात आता प्रकाश आंबेडकरांनी थेट भाजपबरोबर जाण्याचा इशारा दिला आहे. (Latest Prakash Ambedkar News)

" पवारांवरील वक्तव्य हे भूतकाळातील अनुभवावरून केलं होतं. राऊतांऐवजी ठाकरेंनी सल्ला दिला असता तर तो मी ऐकला असता. शेवटी कोणताच पक्ष एकमेकांचा दुश्मन नसतो, मतभेद असू शकतात. भाजप घटनेच्या चौकटीत कार्य करणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही बसू. ", असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देखील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. काल देखील पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशात आता प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्याने ते देखील ठाकरे गटाची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT