'...म्हणून मला कोरोना झाला नाही'; इंदुरीकर महाराजांनी सांगितलं कारण Saam TV
महाराष्ट्र

'...म्हणून मला कोरोना झाला नाही'; इंदुरीकर महाराजांनी सांगितलं कारण

'तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म झाला आहे.'

दिपक क्षीरसागर

लातुर : 'तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत कारण, आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वाचलो. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म झाला आहे.' असं वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी केलं आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये हसून लोटपोट झाले. ते लातूरमध्ये (Latur) आयोजित कीर्तनात बोलत होते. (So I didn’t get corona; Indurikar Maharaj said the reason)

माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार

दरम्यान पुढे म्हणाले, 'जग सध्या कोरोनाच्या माहामारीच्या चक्रव्यूहात अडकलं असताना आपल्याला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार कोरोनाची तिसरी लाट ही आपल्यासाठी नाही असही इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले.

निवृत्ती महाराज इंदुरीकर हे विनोदी किर्तनांसाठी (Kirtan) प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या स्पष्टोक्ते पणामुळे तसेच बोलताना काही दाखले देण्यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदुरीकर महाराजांनी याच्या आधीही मी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य केलं होतं यावरुन चांगलाच वाद झाला होता तर खुद्द राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली होती.

हे देखील पहा -

आजतागायत रस्त्यावर जगणाऱ्या भिकाऱ्याला कधी कोरोना (Corona) झाला का ? असा सवाल उपस्थित लोकांना करत इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, जगात सर्वजण मास्क (Mask) वापरतात, सॅनिटायझर वापरतात तुम्ही फक्त मन खंबीर ठेवा ज्याचं मन खंबीर त्याला काहीच होणार नाही. तसंच इंदुरीकर महाराज पुढे ते म्हणाले 'हॉस्पिटल विकत घेणारे गेले, आता डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवणार? त्यामुळे हसत हसत जगा, असा सल्ला त्यांनी दिला. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, महिन्याचा डॉक्टर ठेवणारेही दरम्यान पैशाचा देखील या कोरोना काळात काही उपयोग झाला नाही हे सांगताना महाराज म्हणाले यमानं लाच घेतली असती, तर या लोकांनी यमालाही चेक पाठवला असता. मात्र यम लाच घेतली नाही असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशी होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Hair Fall: केसांच्या वाढण्यासाठी 'हा' बेस्ट होममेड हेअर मास्क नक्की ट्राय करा, केस गळती होईल कमी

KDMCमध्ये बॅनर वॉर; राजकारणातील 'बाजीगर'; शिंदेंनी भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT