Snake Viral Video  Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आढळला चक्क विषारी साप; पोलिसांची उडाली एकच धावाधाव

मानवी वस्ती जंगल तोडून होऊ लागल्याने वन्य, हिंसक प्राण्याचा वावर वस्तीत वाढला आहे. इमारतीत वाघ, साप आढळून आल्याच्या घटना अनेकदा पाहिल्या असतील.

विकास काटे, ठाणे

Snake Viral Video : मानवी वस्ती जंगल तोडून होऊ लागल्याने वन्य, हिंसक प्राण्याचा वावर वस्तीत वाढला आहे. इमारतीत वाघ, साप आढळून आल्याच्या घटना अनेकदा पाहिल्या असतील. अशीच एक घटना ठाण्यातील नौपाडा भागात घडली आहे. एक विषारी साप ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आढळल्याने कर्मचाऱ्यात एकच भीती पसरली. या विषारी सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

ठाण्यातील (Thane) नौपाडा पोलीस ठाण्यात आज, रविवारी सकाळच्या सुमारास अचानक एक विषारी साप आढळून आला. विषारी साप आढळल्याने पोलीस कर्मचाऱ्यामध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. नौपाडा पोलिसांनी हा साप पाहताच सर्प मित्रांना पाचारण केले. सर्प मित्रांनी पोलीस ठाण्यात पोहचून हा सापाला पकडले आणि जंगलात निसर्गाच्या सानिध्यात या सापाची सुटका केली आहे.

नौपाडा पोलीस ठाण्यात (Thane) आढळून आलेला हा साप फुरसे सदृश्य साप असून तो विषारी आहे. अंदाजे हा साप 4 ते 5 फूट इतका लांब होता. पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणत जंगल वाढले आहे आणि त्या ठिकाणी बांधकामाचे रॅबिट (मलबा) टाकलं जातो.

त्यामुळे त्या ठिकाणाहून हा साप पोलीस ठाण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र सर्प मित्रांनी या सापाला पकडून घेऊन गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. या विषारी सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT