Video: रस्त्यावरील गायींची इनोव्हा गाडीतून तस्करी; घटना CCTV मध्ये कैद Saam TV
महाराष्ट्र

Video: रस्त्यावरील गायींची इनोव्हा गाडीतून तस्करी; घटना CCTV मध्ये कैद

अनेकदा मोठ्या जळ वाहनातून गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्यात.

अरुण जोशी

अमरावती: अनेकदा मोठ्या जळ वाहनातून गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्यात. मात्र चक्क रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची इनोव्हा गाडीतून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे समोर आली आहे.धामणगाव रेल्वेतील शिवाजी चौकात २७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता रस्त्यावरील मोकाट जनावरे असताना एका इनोव्हा गाडीतून ३ माणस उतरली. आणि जनावरांना इंजेक्शन लावून त्यांना इनोव्हा गाडीत कोंबून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस झालं आहे.

त्यानंतर लगेच हीच इनोव्हा गाडी रात्री १ वाजून १८ मिनिटांनी परत येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनावरांना गाडीत कोंबून टाकत नेत असल्याची घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इतकंच नाही तर २ मिनिटांनी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मागेच आली आहे. हा सगळा प्रकार रात्री १ वाजता ते १ वाजून २९ मिनिटांपर्यंत झालाय.मात्र पोलिसांना या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याच पोलीस सांगताहेत.त्यामुळे येथे नक्कीच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.धामणगाव परिसरात जनावरे पळविणारी टोळी सक्रिय असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे मात्र गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT