six injured in bus accident at solapur tuljapur highway today saam tv
महाराष्ट्र

Solapur Tuljapur Highway Accident News : सोलापूर - तुळजापुर महामार्गावर एसटी खड्ड्यात काेसळली, प्रवासी जखमी

या घटनेची नाेंद पाेलीस ठाण्यात झाली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News :

सोलापूर - तुळजापुर महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आज (बुधवार) अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या बस चालकाचे कासेगाव जवळ स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मुका मार लागला आहे. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मधील प्रवासी पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील आहेत. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT