molesting, police, youth, amravati news saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : १६ वर्षाच्या मुलीवर आळीपाळीने अत्याचार; सहा अटकेत

मुलीने तिच्या वडिलांना आपबिती सांगितली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati Crime News : अमरावतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अमरावतीच्या शेंदूरजनाघाट पोलीस ठाणे हद्दीत एका १६ वर्षीय मुलीवर सहा नराधमांनी अत्याचार केला. या सहा संशयित आराेपींना पाेलिसांनी अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)

ही घटना सहा डिसेंबरला घडली. एका परिचीत महिलेने (women) संबंधित मुलीस एकाच्या घरी पाठवले. त्यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या पाच जणांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यामुळे पिडीत मुलगी भेदरली. तिने नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली आणि तेथून धूम ठाेकली.

त्यानंतर पुन्हा एकाने तिच्यावर दबाव टाकत एका शिवारात अत्याचार केला. मुलीने तिच्या वडिलांना आपबिती सांगितली. तिच्या वडिलांनी शेंदूरजना पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व घटनाक्रम पाेलिसांनी सांगितला. पाेलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीनूसार सहा जणांवर बाल लैंगिक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला. सर्व सहा नराधमांना बेड्या ठोकल्या. या सर्वांना न्यायालयाने (court) बावीस डिसेंबर पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pillow Hygiene: तुम्ही वापरत असलेल्या उशीर कव्हर आरोग्यासाठी ठरतात धोकादायक

MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

Diabetes -High BP : मधुमेहाच्या रुग्णांना हाय बीपीचाही त्रास आहे? लाइफस्टाइलमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, नाहीतर...

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा! 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू; 'राजा शिवाजी'ला देतोय तगडी टक्कर, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने किती कमावले?

EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! UPI मधून पीएफचे किती पैसे काढता येतात? वाचा EPFOचे नियम

SCROLL FOR NEXT