Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

पर्यटकांना खुणावतोय वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; पर्यटकांची तुफान गर्दी

या वर्षात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्याने डोंगररांगा रांगातून पडणाऱ्या शुभ्र आणि उंचावरून पडणाऱ्या हळुवार धबधब्यांने मोहून टाकलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमधील सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहत आहे. गेल्या ५ दिवसांपासून जोरदार पावसामुळे या धबधब्याचे असे सकाळी नयनरम्य दृश्य पहायला मिळाले. डोळ्यात साठवून ठेवण्याजोगे ही नयनरम्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात 5 दिवसांपासून पाऊस पडत आहे. या वर्षात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्याने डोंगररांगा रांगातून पडणाऱ्या शुभ्र आणि उंचावरून पडणाऱ्या हळुवार धबधब्यांने मोहून टाकलं आहे.

हे देखील पाहा -

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलका पाऊस पडल्यानं शेतातल्या पिकांना जीवदान मिळालंय. दुसरीकडे औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे. या पावसामुळे पर्यटनाच्या राजधानीत चित्रच आठवडाभरात बदलून गेलं आहे.

वेरूळ, दौलताबाद डोंगररांगानी हिरवागार शालू पांघरल्या आहेत. या सौंदर्यात भर पडते ती वेरूळ लेणी परिसरातील डोंगरातल्या धबधब्याने. आठवडाभरापूर्वी जोरात पाऊस झाला होता, त्यावेळी वेरूळच्या सीता नाहनीजवळच धबधबा ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुललं आहे. आता शांत, शुभ्र, उंचावरून पडणारा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT