SINDHUTAI SAPKAL’S SON BOOKED IN POCSO CASE saam tv
महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

POCSO Case Filed Against Sindhutai Sapkal’s Son In Amravati: ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र दिगंत अरुण सपकाळ यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक छळ प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

Omkar Sonawane

अमर घटारे, साम टीव्ही

सामाजिक क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अरुण सपकाळ यांच्या विरोधात हा धक्कादायक आरोप झाल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. प्रख्यात समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या संचालिका सावित्रीबाई फुले महिला स्वयंसिद्धा संस्थेतील एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप सिंधुताईंचा मुलगा दिगंत अरुण सपकाळ यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम ७८, ७९, ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ६ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले असून, घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याशी संबंधित संस्थेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, ६ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; आज कुठे कसं राहिल हवामान?

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT