Sindhudurg Two revenue officers suspended  Saam Tv News
महाराष्ट्र

Sindhudurg : राजशिष्टाचाराचं उल्लंघन करत मुख्यमंत्र्यांची भेट, 'त्या' दोन लाचखोर अधिकाऱ्यांचं निलंबन

Sindhudurg News : ही कारवाई जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यात सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांचा समावेश आहे.

Prashant Patil

सिंधुदुर्ग : राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघे महसुल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी संबंधित दोघेही परवानगी न घेता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असताना सुद्धा त्यांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राज शिष्टाचार पाळला नाही, असा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यात सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी लाच घेताना हे दोघेही अधीकारी lCBच्या जाळ्यात सापडले होते. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याचा सत्कार केला होता. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत हा प्रकार उघड केला होता. तर या मागचा आका कोण असा सवाल उपस्थित केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Urine Infection : पावसाळ्यात रोज 'हे' सुपरफूड खा; बाजारात सहज मिळेल, युरिन इन्फेक्शनपासून वाचाल

श्रावणासाठी परफेक्ट रेसिपी, घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बटाट्याचे पौष्टिक लाडू,

Super Obesity: 209 किलो वजन, श्वास घेणंही अवघड; डॉक्टरांनी 32 दिवसांत असा केला चमत्कार, रुग्णाला मिळालं नवं आयुष्य

SCROLL FOR NEXT