Sindhudurg Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण; गोट्या सावंत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

गोट्या सावंत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कणकवली कोर्टासमोर शरण आले.

वृत्तसंस्था

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कणकवली कोर्टासमोर शरण आले. कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी युक्तिवाद केला (Sindhudurg Santosh Parab Attack Case Kankavali Divani Court remanded Gotya Sawant In police custody for two days).

गोट्या सावंत यांचा जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून पोलीस (Police) तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर गोट्या सावंत (Gotya Sawant) यांच्या वतीने वकील राजेंद्र रावराणे आणि ऍडव्हकेट उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाने गोट्या सावंत यांना 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण

शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) प्रकरणात संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वकील राजेंद्र रावराणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपस्थित होत्या.

न्यायालयात हजर झाल्यानंतर गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी याबाबत कणकवली न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत गोट्या सावंत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा

मराठवाड्यातील भयान वास्तव! महिन्यात ७६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले, सर्वाधिक संख्या बीडमधील

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

SCROLL FOR NEXT