Nitesh Rane on Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Nitesh Rane on Uddhav Thackeray: ...तर उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही: नितेश राणे

Nitesh Rane : ...तर उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही: नितेश राणे

Satish Kengar

>> विनायक वंजारे

Nitesh Rane on Uddhav Thackeray: ''संजय राऊत जर भाजपच्या कुठल्याही नेत्यांवर बोलले टीका केली, तर उद्धव ठाकरे यांचे कपडे मी फाडल्याशिवाय राहणार नाही, असं भाजप आमदार आंसार नितेश राणे म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

नितेश राणे म्हणाले की, ''उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सकाळचा नऊचा वाजणारा भोंगा बंद करण्यासाठी पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे.''

ते म्हणाले, '' संजय राऊत  यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर खोटा नाटा आरोप केला, खालच्या पातळीवर टीका केल्यास संजय राऊत यांनी माझी पहिली पत्रकार परिषद आवर्जून ऐकावी आणि सेव्ह करून ठेवावी.'' (Latest Political News)

नितेश राणे पुढे म्हणाले, ''बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक म्हणून आणि मोठे झालेले आहोत. संजय राऊत यांच्या सारखे चायनीज मॉडेल आम्ही नाही.''

राऊतांवर हल्लाबोल करत ते म्हणाले, ''संजय राऊत हे भाजपच्या एकही नेत्यावर बोलले, तर पुढच्या अर्ध्या तासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडेन.'' ते म्हणाले, ''39 वर्ष नारायण राणे शिवसेनेत बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून राहिलेले आहेत. यापुढे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो बघून बोलावं की यांचे कपडे ठेवायचे की नाही.''  (Maharashtra Politics)

राऊतांवर देशद्रोहाचा खटला सरकारने चालवावा : नितेश राणे

नुकतेच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, सत्यवान मलिकबद्दल आजच्या तारखेला पाकिस्तान गोडवे गट आहेत. त्यांना भेटायला संजय राऊत जात आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारने चालवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT