Sindhudurg News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : रात्री बंद घरात करायचे पूजा अर्चा; अघोरी कृत्य करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Sindhudurg Kudal News : कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात दोन ते तीन महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे चार ते पाचजण ये- जा करत होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. संशयित व्यक्ती बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 
कुडाळ (सिंधुदुर्ग)
 : गावात येऊन घरांमध्ये रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत अघोरी प्रयोग केला जात होता. गावातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी याठिकाणी तपासणी केली असता घरात सुरु असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घरात वास्तव्य करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात अघोरी कृत्य व जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात दोन ते तीन महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे चार ते पाचजण ये- जा करत होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मुंबईतील या संशयित व्यक्ती बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत होते. गावातील नागरिकांना याबाबत संशय आला होता. 

पाचजण ताब्यात 

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळावर धाड टाकली असता धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्या घरात संशयितांनी आठ फुटाचा खड्डाही खोदल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसांनी संशयित पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. 

नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता 

घरात एक मोठा खड्डा खोदून त्या ठिकाणी पूजेचे साहित्य त्यात दोरे, बाहुली, लिंबू, अबीर, बुका, शेंदूर अशा वस्तू आढळून आल्या आहेत. दरम्यान या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून नरबळीचा प्रकार आहे का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहीती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT