- विनायक वंजारे
शिक्षणमंत्री दीपक केसरकर (education minister deepak kesarkar) यांच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातच मुलांच्या शिक्षणाची परवड सुरु असल्याची धक्कादायक बाब साम टीव्हीने जनतेसमाेर आणली. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने आरे गावातील गणपतीचीवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नेमणुक केली. साम टीव्हीमुळे माझ्या मुलास न्याय मिळाल्याची विद्यार्थ्याच्या पालकाने नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवगड तालुक्यातील आरे गावातील गणपतीचीवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा गेल्या दोन महिन्यापासून बंद करण्यात आली होती. या शाळेतील शिक्षिकेला दुसर्या शाळेत कामगिरीसाठी पाठवण्यात आल्याने शाळा बंद करण्यात आली होती. (Maharashtra News)
या शाळेत इयत्ता चौथीत शिकणा-या एका विद्यार्थ्यास शाळेच्या व्हरांड्यात बसून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत होते. त्याचे सचित्र दर्शन साम टीव्हीने जनतेसमाेर आणले. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने संबंधित शाळेत दुसर्या शाळेत बदली करण्यात आलेल्या शिक्षिकेची पुन्हा नियुक्ती केली. त्यामुळे पुन्हा एकदा गणपतीचीवाडीतील शाळा सुरु झाली. दरम्यान विद्यार्थ्याला न्याय मिळाल्याने आरे गावातील ग्रामस्थांनी साम टीव्हीचे आभार मानले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.