Sindhudurg Devgad Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg Accident : सिंधुदुर्गमध्ये भीषण अपघात! भरधाव बस आणि रिक्षाची जोरदार धडक, वाहनांचा चक्काचूर; चौघांचा जागीच मृत्यू

Devgad Accident : देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे बस आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sindhudurg Devgad Accident : सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी अपघातातून सुखरुप बचावला असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रवासी जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे एसटी बस आणि रिक्षा यांच्यात टक्कर झाली. विजयदुर्ग मालवण येथून एसटी बस नारिंगरे येथे आली असता हा अपघात झाला. समोरुन येणाऱ्या रिक्षामधील रिक्षाचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव रिक्षा एसटी बसला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा पार चकाचूर झाला.

बस आणि रिक्षा धडकीत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक प्रवासी थोडक्यात बचावला आहे. अपघातात जखमी झालेल्या या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT