ajit pawar & narayan rane 
महाराष्ट्र

अजित पवारांची भीती खरी ठरली; मविआचा उमेदवार पडला; भाजपचा जल्लाेष

आज सकाळी मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.

अमोल कलये, अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : सिंधूदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झालेला आहे. सावंत यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे (राणे गट) विठ्ठल देसाई यांचा चिठ्ठीद्वारे विजयी झाला आहे. या विजयानंतर राणे गटाने जल्लाेष सुरु केला आहे. (sindhudurg dcc bank election result update)

सिंधूदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) मतमोजणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये भाजपाने ४ आणि शिवसेनेने ४ अशा जागांवर विजय मिळविला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे मतमाेजणी सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचा सर्वाधिक धक्कादायक निकाल कणकवलीत (kankavali) लागला आहे. या बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत यांचा पराभव झाला आहे. सिंधूदूर्गात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांनी सतर्क राहावे साता-यात चिठ्ठीच्या माध्यमातून मविआला काही जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांशी संपर्क ठेवा असं सांगतले हाेते.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे (bjp) सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा पणास लागली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT