narayan rane & rajan teli 
महाराष्ट्र

Sindhudurg DCC त सत्तेकडे वाटचाल; नारायण राणेंचा माेहरा पडला

आज मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.

अमोल कलये, अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीत १९ जागांपैकी १२ जागांवर भाजपने म्हणजेच नारायण राणे गटाने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान मविआचे प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. दूसरीकडे नारायण राणे गटाचे प्रमुख उमेदवार राजन तेली यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांनी पराभवाचा धक्का दिला आहे. तेलींच्या पराभवामुळे राणे गटास धक्का बसला आहे. यंदाच्या निवडणुकीतील रंगत निकालातून देखील दिसून आली आहे. Sindhudurg District Bank Election Live updates

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) यंदा १९ जागांसाठी मतदान सुरु झालेले आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवार आहेत. यासाठी ९८१ मतदारांपैकी ९६८ मतदारांनी (voter) त्यांचा हक्क बजावला हाेता. आज मतमाेजणीस प्रारंभ झालेला आहे. हळूहळू निकाल हाती येत आहेत (Sindhudurg district bank election 2021 result). आत्तापर्यंत १२ जागांवर राणे गट आणि मविआ गट ५ जागांवर विजय मिळविला आहे.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे (bjp) सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे (Nitesh rane vs Mahavikas aghadi). महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा पणास लागली हाेती. त्यांचा पराभव झाल्याने मविआला धक्का बसला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT