Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Big Breaking: नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला; राणेंभाेवती पाेलिसांचा गराडा

आजच्या निकालाकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधूदुर्ग : संताेष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा नियमीत जामीन अर्ज सिंधूदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे राणे समर्थकांना माेठा धक्का बसला आहे. (nitesh rane latest marathi news)

नितेश राणेंच्या (nitesh rane) नियमित जामीनावर आज (मंळवार) जिल्हा न्यायालयात अंतिम निकाल येणार हाेता. दुपारी तीन वाजता जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर बी रोटे यांनी राणेंचा जामीन (bail) अर्ज फेटाळल्याचा निकाल दिला. (nitesh rane bail application latest update). सध्या नितेश राणेंनी भाेवती पाेलिसांनी गराडा घातला आहे. माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) हे पाेलिसांशी चर्चा करीत आहेत.

दहा दिवसाच्या मुदतीत राणे हे हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. तो पर्यंत नितेश राणेंना अटके पासून संरक्षण असल्याची माहिती समाेर येत आहे. याबाबत नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी ही माहिती दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT