Shweta Mahale alleges harassment of women by Sanjay Gaikwad supporters saam tv
महाराष्ट्र

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

Shweta Mahale vs Sanjay Gaikwad: शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा पेटलाय. मात्र यावेळी गायकवाडांच्या समर्थकांवर महालेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीय.. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्षांच्या आमदारांमधला संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसतोय. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वाढदिवसाच्या शक्तिप्रदर्शनापासून सुरू झालेला हा वाद आता थेट गयकवाड समर्थकांनी महिलांना दिलेल्या त्रासापर्यंत पोहचलाय... गायकवाडांचे समर्थक 10 ते 12 महिलांना अश्लील मेसेज करत असल्याचा आरोप श्वेता महालेंनी केलाय.. याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही महालेंनी दिलाय....मात्र दुसरीकडे शिवसैनिकांकडून असे मेसेज जात असल्याचा पुरावा द्या, अन्यथा बदनामी थांबवा, असं प्रत्युत्तर संजय गायकवाडांनी दिलयं....

दुसरीकडे शिंदेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी श्वेता महाले यांच्यावर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलयं....मात्र श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील वादाला कशी सुरूवात झाली ते पाहूयात...

यावरून महाले समर्थकांनी गायकवाडांविरोधात बुलढाण्यात कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे राज्य पातळीवर भाजप आणि शिंदेसेना एकत्र सत्तेत असताना, स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आमनेसामने आलेत. एका बाजूला श्वेता महाले "महायुतीत समन्वय आहे, पण एका व्यक्तीमुळे वातावरण खराब होत आहे" अशी टीका करत आहेत; तर दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे या संघर्ष वाढत चाललाय. आता गायकवाड समर्थकांनी केलेल्या अश्लील मेसेजच्या प्रकरणात तक्रार दाखल होणार का? महाले आणि गायकवाड यांच्यातला संघर्ष आणखी वाढणार की थांबणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

गोकुळच्या खाजगीकरणासाठी 200 कोटींची ऑफर; ऐन निवडणुकीत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Update: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या, एका प्रामाणिक व पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करा- राहुल गांधींची मागणी

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

SCROLL FOR NEXT